शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 07:28 IST

अहिल्यानगर शहरात अवैध शस्त्रांची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

अहिल्यानगर : तोफखाना पोलिस व दक्षिण कमांड मिलिट्री इंटेलिजन्स यांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) रात्री अवैध शस्त्र व बनावट शस्त्र परवाना देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, नऊजणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये १२ बोअर रायफल, ९ रायफल व ५८ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अहिल्यानगर शहरात अवैध शस्त्रांची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार बनावट ग्राहक पाठवून अवैध शस्त्रांची विक्री केली जात असल्याची खात्री करण्यात आली. यानंतर राजौरी जिल्हाधिकारी (जम्मू व काश्मीर) यांना पत्र पाठवून माहिती घेतली असता वितरित करण्यात आलेली शस्त्रे अवैध असून, बनावट परवाने असल्याचे त्यांनी कळवले. 

बँकांसह महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक 

-खोट्या कागदपत्रांच्या आधारे नऊजणांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील बँकासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नोकरी मिळविल्याचे उघडकीस आले. 

-यामध्ये शेर अहेमद गुलाम हुसेर (रा. कलाकोठ, राजौरी) हा मुख्य आरोपी असून, सुरक्षा रक्षकांची नोकरी मिळण्याकरिता बनावट शस्त्र परवाना व १२ बोअर रायफल मिळवून देत होता. यासाठी तो प्रत्येकी पन्नास हजार घेत असल्याचे निष्पन्न झाले.

-यानंतर तोफखाना पोलिस व दक्षिण कमांड मिलिट्री इंटेलिजन्स यांनी अहिल्यानगर, श्रीगोंदा, सोनई, पुणे अशा विविध ठिकाणी नोकरी करत असलेल्या नऊजणांना ताब्यात घेतले आहे.

जम्मू-काश्मीरचे रहिवासी

ताब्यात घेण्यात आलेले सर्व जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या अहिल्यानगरसह पुण्यात वास्तव्यास होते. यात शब्बीर मोहमंद इक्बाल हुसैन गुज्जर (वय ३८, रा. नागापूर, अहिल्यानगर), महंमद सलीम ऊर्फ सालेम गुल महंमद (३२, नागापूर, अहिल्यानगर), महंमद सफराज नजीर हुसैन (२४, घोगरगाव, अहिल्यानगर), जहांगीर झाकीर हुसैन (२८, रा. नागापूर, अहिल्यानगर), शाहबाज अहमद नजीर हुसैन (३३, रा. श्रीगोंदा), सुरजित रमेशचंद्र सिंग (नेवासा, अहिल्यानगर), अब्दुल रशिद चिडीया (३८, रा. पुणे), तुफेल अहमद महंद गाजीया (स्वारगेट, पुणे), शेर अहमद गुलाम हुसैन (रा. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दक्षिण कमांड मिलिट्री इंटेलिजन्स, पुणे व पोलिसांनी केली.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी