ईडीच्या चौकशी लावण्यामागे फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:26 IST2021-02-17T04:26:30+5:302021-02-17T04:26:30+5:30

अहमदनगर : भाजपाच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या पाठीमागे ईडीच्या चौकशी लावल्या जात असून, यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोप ...

Fadnavis behind ED's inquiry | ईडीच्या चौकशी लावण्यामागे फडणवीस

ईडीच्या चौकशी लावण्यामागे फडणवीस

अहमदनगर : भाजपाच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या पाठीमागे ईडीच्या चौकशी लावल्या जात असून, यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोप करत आता ईडी आणि सीबीआयच्या चौकशीबाबत राज्य सरकार कायदा करणार असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुश्रीफ म्हणाले, भाजपाच्या विरोधात भूमिका मांडली की, ईडीकडून चौकशी लावली जात आहे. असे राजकारण याआधी कधीही झाले नव्हते. विरोधातील आवाज दाबून टाकण्याचा हा प्रकार आहे. हे सर्व फडणवीस हेच करत आहेत. याबाबत आता राज्यात महाविकास आघाडी सरकार कायदा आणणार आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूबाबत मुश्रीफ म्हणाले केवळ संशय आणि आरोपावरून एखाद्या व्यक्तीला लक्ष करणे चुकीचे आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबतही असा प्रकार घडला होता. आता या प्रकरणातील सत्यही लवकरच बाहेर येईल. नगर येथील रेखा जरे हत्याकांडाबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले या प्रकरणात पोलिसांवर कुणाचाही दबाव नाही. या गुन्ह्यातील फरार आरोपीला पोलीस लवकरच अटक करतील, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Fadnavis behind ED's inquiry