फेसबुक अकाऊंट हॅक करणा-या संगमनेरच्या तरुणास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 18:23 IST2018-01-24T18:22:57+5:302018-01-24T18:23:17+5:30
फेसबुक अकाऊंट हॅक करून त्याचा गैरवापर करणा-या तरूणास सायबर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. अशोक गुंजाळ (वय १९, रा. जुना जोर्वे ता. संगमनेर) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.

फेसबुक अकाऊंट हॅक करणा-या संगमनेरच्या तरुणास अटक
अहमदनगर : फेसबुक अकाऊंट हॅक करून त्याचा गैरवापर करणा-या तरूणास सायबर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. अशोक गुंजाळ (वय १९, रा. जुना जोर्वे ता. संगमनेर) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.
संगमनेर तालुक्यातील साळीवाडा येथील ललीत सुरेशचंद्र ओझा यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यावर दोन मुलींचे फोटो पोस्ट केले होते. याबाबत ओझा यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास केल्यानंतर ओझा यांचे फेसबुक गुंजाळ याने हॅक केल्याचे समोर आले. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक करून त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ४३,६५,६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पवार यांच्यासह उपनिरीक्षक प्रतिक कोळी, सहाय्यक फौजदार सलीम पठाण, कॉन्स्टेबल वाव्हळ, राहुल गुंडू, आकाश भैरट, प्रशांत राठोड, सम्राट गायकवाड, भगवान कोंडार, सीमा भांमरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.