शेवगाव, पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:32+5:302021-09-02T04:46:32+5:30
अहमदनगर : शेवगाव तालुक्यात ८५ मिमी तर पाथर्डी तालुक्यात १९८ मिमी इतका पाऊस झाला. या पावसाने दोन्ही तालुक्यात दाणादाण ...

शेवगाव, पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी
अहमदनगर : शेवगाव तालुक्यात ८५ मिमी तर पाथर्डी तालुक्यात १९८ मिमी इतका पाऊस झाला. या पावसाने दोन्ही तालुक्यात दाणादाण उडाली. नगर शहरातील सीना नदीलाही पूर आला. पाथर्डी तालुक्यात टाकळी मंडळात सर्वाधिक २८७ मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. शेवगाव तालुक्यात २०५, तर पाथर्डी तालुक्यात १२८ जनावरांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
नगर तालुक्यात देवगाव, रतडगाव, पोखर्डी, जेऊर, डोंगरगण या गावात सात घरांचे नुकसान झाले. नेवासा तालुक्यात घोडेगाव, शिरसगाव, सोनई, धनगरवाडी, या गावात तीन घरांची पडझड झाली. राहुरी तालुक्यात देसवंडी येथे दोन घरांची पडझड झाली. शेवगाव तालुक्यात भगूर येथील २५ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. वरूर गावातील २३ नागरिकांना स्थलातंरित करण्यात आले. लांडे वस्तीतील ५० जणांना घराच्या बाहेर काढण्यात आले. शेवगाव तालुक्यात दहा गावे बाधित झाली आहेत. पाच निवारा केंद्रात ९० नागरिकांची व्यवस्था करण्यात आली. १५० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून एक जण बेपत्ता आहे. पाथर्डी तालुक्यात कोरडगाव, सोमठाणे, औरंगपूर,पांगोरी पिंपळगाव ही नदीकाठावरील गावे पावसाने बाधित झाली. कोरडगावातील ८० कुटुंबे बाधित असून २३० लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. पाथर्डी तालुक्यात १२८ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
नंदिनी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. नागरिकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफ व औरंगाबाद येथील पथकांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, त्यांची निवास व जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यंत्रणांना दिले आहेत. तसेच दोन दिवसात पिकांचे पंचनामे करण्याचेही आदेश दिले आहेत.
---
पाथर्डीत १९८ मिमी पाऊस
जिल्ह्यात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. तो मिमी मध्ये असा. नगर (७०), पारनेर (३०.३), श्रीगोंदा (२७.३), कर्जत (२८.१), जामखेड (४८.२), शेवगाव (८५.७), पाथर्डी (१९८.९), नेवासा (३६.८), राहुरी (४०.३), संगमनेर (९.४), अकोले (४.४), कोपरगाव (१२.७), श्रीरामपूर (२७.१), राहाता (९.०) असा पाऊस झाला. सोमवारी झालेल्या पावसाची एकूण सरासरी ४० मिमी. इतकी होती.जिल्ह्यात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. तो मिमी मध्ये असा. नगर (७०), पारनेर (३०.३), श्रीगोंदा (२७.३), कर्जत (२८.१), जामखेड (४८.२), शेवगाव (८५.७), पाथर्डी (१९८.९), नेवासा (३६.८), राहुरी (४०.३), संगमनेर (९.४), अकोले (४.४), कोपरगाव (१२.७), श्रीरामपूर (२७.१), राहाता (९.०) असा पाऊस झाला. सोमवारी झालेल्या पावसाची एकूण सरासरी ४० मिमी इतकी होती.
----
फोटो- ३१ शेवगाव पूर
शेवगाव तालुक्यातील नानी नदीला आलेल्या पुरामुळे शेतातील पिकेही पाण्यात बुडाली.