वाळूटंचाईवर ‘जिप्सम’चा उतारा

By Admin | Updated: October 12, 2016 01:05 IST2016-10-12T00:30:19+5:302016-10-12T01:05:00+5:30

राहुरी : मुळा नदीतून सध्या पाणी वाहत असल्याने वाळूटंचाई निर्माण झाली असून, बांधकाम व्यावसायिक पर्याय म्हणून जिप्सम प्लॅस्टरचा वापर करू लागले

Extraction of gypsum on desertification | वाळूटंचाईवर ‘जिप्सम’चा उतारा

वाळूटंचाईवर ‘जिप्सम’चा उतारा


राहुरी : मुळा नदीतून सध्या पाणी वाहत असल्याने वाळूटंचाई निर्माण झाली असून, बांधकाम व्यावसायिक पर्याय म्हणून जिप्सम प्लॅस्टरचा वापर करू लागले आहेत़ वाळूअभावी राहुरी तालुक्यात २०० ते २५० कामे बंद पडली आहेत़
मुळा नदीमध्ये खडक लागल्याने वाळू संपण्याच्या मार्गावर आहे़ नदीचे पात्र वीस फूट खोल गेले आहे़ दोन दशकापासून वाळू उपसा सुरू असल्याने विहिरीच्या खोलीपेक्षा नदीची खोली जास्त खोल झाली आहे़ मिळेल तेथून वाळू उचलण्याचे प्रकार सुरू आहेत़ त्यातच दोन महिन्यापासून मुळा नदीला पूर आला आहे़ त्यामुळे बांधकामासाठी वाळू कशी उपलब्ध करायची हा प्रश्न बांधकाम व्यवसायिकांसमोर उभा ठाकला आहे.
बांधकाम झाल्यानंतर बाहेरून प्लॅस्टरसाठी वाळूचा वापर केला जात आहे़ आतून प्लॅस्टरऐवजी वीटकामावर जिप्समचे प्लॅस्टर केले जात असल्याची माहिती आर्किटेक्ट जोगिंदरसिंग कथुरिया यांनी दिली़ आरसीसीमध्ये वीटकामाला ग्रीट पावडर अर्थात खडीच्या बारीक चुर्णचा वापर केला जात आहे़ ग्रीट पावडरचा दर बाराशे रूपये ब्रास असा आहे़ बांधकामामध्ये ग्रीट पावडरचा शंभर टक्के वापर होतो़ याउलट वाळू वापरताना जास्त प्रमाणात वाया जाते़ त्यामुळे ग्रीट पावडर महाग असली तरी वाळूच्या बरोबरीने दर पडतो़ ग्रीट पावडरचा वापर केल्यामुळे बांधकामाला तडे जात नाही ही जमेची बाजू आहे़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Extraction of gypsum on desertification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.