शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

टंचाई योजनांना ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: August 2, 2014 01:01 IST

अहमदनगर: जिल्ह्यातील टंचाईच्या उपाययोजना बंद न करता सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

अहमदनगर: जिल्ह्यातील टंचाईच्या उपाययोजना बंद न करता सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ टंचाईच्या विविध योजनांना येत्या ३१आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, टँकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली़महसूल दिनानिमित विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कवडे बोलत होते़ त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली़ पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला़ यासह विविध उपाययोजनाही करण्यात येत आहेत़ सुरुवातीला ३० जुलैपर्यंत याविषयीच्या विविध योजनांना मुदतवाढ दिली होती़ जुलैमध्ये पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती़ मात्र जुलै महिन्यांत पावसाची सरासरी वाढली नाही़ त्यामुळे शासनाने टंचाईबाबतच्या विविध योजनांना येत्या ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार उपाययोजना सुरू ठेवल्या जातील़ योजनांचा फेर आढावा घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत़ जिल्ह्यात कुठे टँकरची आवश्यकता आहे आणि कुठे नाही, याविषयीचा अहवाल मागविण्यात आला आहे़ अहवाल प्राप्त झाल्यानंतर टँकरबाबत निर्णय घेतला जाईल़ मात्र जिथे गरज आहे, तिथे टँकर दिले जातील, असे कवडे यावेळी म्हणाले़जिल्ह्यात आतापर्यंत २३ टक्के इतकाच पाऊस झाला आहे़ पुरेसा पाऊस पडला नाही़ सुदैवाने मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला़ त्यामुळे दोन्ही धरणांत नवीन पाण्याची आवक सुरू झाली़ मुळा ४६ तर भंडारदरा धरण ६२ टक्के इतके भरले आहे़ त्यात आता पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोरही ओसरला आहे़ त्यामुळे आवक मंदावली असून, आणखी पाऊस होण्याची गरज आहे़ शासनाच्या वतीने पाणीटंचाई असलेल्या गावात ज्या उपाय योजना सुरू आहेत, त्या सुरूच राहतील़ त्यात खंड पडणार नाही, असे ते म्हणाले़ (प्रतिनिधी) २८१ गावांत टंचाई कायमजिल्ह्यातील २८१ गावे आणि १ हजार ३०१ वाड्या-वस्त्यांना ३४९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला तरीदेखील टँकरची संख्या कायम आहे़त्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेशमाळीण येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत़ आपत्ती व्यवस्थापन कक्षातील यंत्रणा अद्ययावत करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, जिल्ह्यात धोकादायक असलेल्या परिसराची पाहणी करून अहवाल मागविण्यात आले आहेत, असे कवडे यांनी यावेळी सांगितले़