यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशाला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST2021-09-10T04:27:44+5:302021-09-10T04:27:44+5:30
विद्यापीठाच्या प्रवेशाविषयी माहिती देण्यासाठी न्यू आर्टस महाविद्यालयात बुधवारी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी केंद्राचे नाशिक विभागीय संचालक प्रा. डाॅ. धनंजय ...

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशाला मुदतवाढ
विद्यापीठाच्या प्रवेशाविषयी माहिती देण्यासाठी न्यू आर्टस महाविद्यालयात बुधवारी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी केंद्राचे नाशिक विभागीय संचालक प्रा. डाॅ. धनंजय माने यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, विभागीय केंद्रांतर्गत नाशिक, नगर, धुळे, जळगाव व नंदूरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश असून विविध शिक्षणक्रमांची एकूण ३१७ अभ्यासकेंद्र आहेत. नगर जिल्ह्यात एकूण ६२ अभ्यासकेंद्रे आहेत. दरवर्षी नगर जिल्ह्यातून विविध अभ्यासक्रमांसाठी सुमारे १ लाख प्रवेश होत असतात. परंतु यंदा कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे २५ हजार प्रवेश झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या अजून परीक्षा सुरू आहेत. त्या संपल्या की प्रवेशाला गती येईल. विद्यापीठाने ycmou.digitaluniversity.ac OR ycmou.ac.in या संकेतस्थळावर ॲानलाईन पद्धतीने प्रवेश सुरू आहेत. तसेच यावर्षी विद्यापीठाने एम. ए. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू , लोकप्रशासन, एम.एस्सी, फिजिक्स, केमिस्ट्री, बाॅटनी, झुआलाॅजी, गणित, पर्यावरण आदी पदव्युत्तर शिक्षणक्र सुरू केलेले आहेत. या शिक्षणक्रमास मर्यादित जागा उपलब्ध आहेत, तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन माने यांनी केले. यावेळी केंद्र संयोजक डाॅ. पी. टी. शेळके, विलास दशपुते आदी उपस्थित होते.