अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोल विक्रीची वेळ वाढविली,सकाळी ०५ ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत पेट्रोल विक्रीस परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 19:31 IST2020-05-06T19:31:27+5:302020-05-06T19:31:35+5:30
अहमदनगर-अहमदनगर जिल्ह्याच्या महसूल सीमा हद्दीमध्ये दररोज पेट्रोल आणि एलपीजी इंधन विक्री वेळ वाढविण्यात आली आहे. आता सकाळी ०५ ते सायंकाळी ०५ अशी विक्रीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. डिझेल विक्री पूर्वीप्रमाणेच २४ तास सुरु राहील. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोल विक्रीची वेळ वाढविली,सकाळी ०५ ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत पेट्रोल विक्रीस परवानगी
अहमदनगर-अहमदनगर जिल्ह्याच्या महसूल सीमा हद्दीमध्ये दररोज पेट्रोल आणि एलपीजी इंधन विक्री वेळ वाढविण्यात आली आहे. आता सकाळी ०५ ते सायंकाळी ०५ अशी विक्रीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. डिझेल विक्री पूर्वीप्रमाणेच २४ तास सुरु राहील. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन वगळता सार्वजनिक सोईसुविधांच्या अनुषंगाने पेट्रोल आणि एलपीजी इंधन विक्रीची वेळ वाढविण्यात आली आहे.
कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय/ कायदेशीर कारवाईस आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.