छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवून मोदी राज्य कारभार करतील अशी अपेक्षा - ग्रामविकास मंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 12:40 IST2021-06-06T11:36:43+5:302021-06-06T12:40:54+5:30
अहमदनगर: राज्य कशासाठी करायचे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेले आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवून पंतप्रधान मोदी कारभार करतील आणि या देशाला भयमुक्त करतील, अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवून मोदी राज्य कारभार करतील अशी अपेक्षा - ग्रामविकास मंत्री
अहमदनगर: राज्य कशासाठी करायचे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेले आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवून पंतप्रधान मोदी कारभार करतील आणि या देशाला भयमुक्त करतील, अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी व्यक्त केली.
अहमदनगर येथील शिवराज्यभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटकडून जून महिन्यामध्ये दीड हजार कोटी उपलब्ध करून देण्याचे कबूल केले होते. परंतु केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला धमकी दिली आणि त्यामुळे हे डोस राज्याला मिळू शकलेले नाहीत. एकीकडे राज्य सरकारला डोस द्यायला सांगायचं आणि दुसरीकडे कंपन्यांना धमक्या द्यायचा हे योग्य नाही.
१८ वर्षावरील वयोगटाला लस देण्यासाठी केंद्र सरकारने नियोजन करणे, संपूर्ण देशासाठी लसीकरणाबाबत एकच धोरण असावे, याबाबत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे लवकरच मोदी यांची भेट घेणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी भारतासाठी पंचवीस हजार कोटी डोस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. मोदी यांनी बायडनविरोधात प्रचार केला होता. नमस्ते ट्रम्प म्हणून या देशात ट््म्प यांना आणले. विरोधात प्रचार केेेला तरीही भारताला लस दिली.