नगरमधील चार मटकाकिंग जिल्ह्यातून हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 14:17 IST2018-03-24T14:17:06+5:302018-03-24T14:17:42+5:30
नगर शहरात मटकाकिंग म्हणून ओळख असलेल्या राजू उर्फ राजूमामा दत्तात्रय जाधव याच्यासह चार मटका बुकींना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

नगरमधील चार मटकाकिंग जिल्ह्यातून हद्दपार
अहमदनगर : नगर शहरात मटकाकिंग म्हणून ओळख असलेल्या राजू उर्फ राजूमामा दत्तात्रय जाधव याच्यासह चार मटका बुकींना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ही कारवाई केली. जाधव याच्यासह जगदीश वामन वाकोडे (रा. सिव्हिल हडको, नगर), संजय रामचंद्र पेठकर (तोफखाना) व विजय गंगाराम गवळी यांचा समावेश आहे. हद्दपार केलेले चार जण नगर शहरात विविध ठिकाणी मटका अड्डे चालवितात. त्यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा, लॉटरी अधिनियम प्रमाणे अनेक गुन्हे दाखल आहेत. तोफखाना पोलीसांनी जाधव याच्यासह इतर तिघांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे टोळी तडीपारीचा प्रस्ताव दाखल केला होता. याबाबत चौकशी करून पोलीस अधीक्षक शर्मा यांनी शुक्रवारी या चौघांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याचे आदेश काढले. पोलीसांच्या या कारवाईने मटका चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान महापालिका निवडणूक नजरेसमोर ठेवून राजूमामा जाधव याने नुकताच शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. आत थेट पोलीसांनीच जिल्ह्यातून जाधव याला हद्दपार केले आहे.