पाचेगावात प्रजासत्ताकदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:36 IST2021-02-05T06:36:11+5:302021-02-05T06:36:11+5:30
पाचेगाव माध्यमिक विद्यालयात भारत सर्व सेवा संघाचे सचिव प्रकाश जाधव, कारवाडी येथील मराठी शाळेत अशोकचे संचालक दिगंबर तुवर, ...

पाचेगावात प्रजासत्ताकदिन उत्साहात
पाचेगाव माध्यमिक विद्यालयात भारत सर्व सेवा संघाचे सचिव प्रकाश जाधव, कारवाडी येथील मराठी शाळेत अशोकचे संचालक दिगंबर तुवर, तलाठी कार्यालय येथे कामगार तलाठी गणेश जाधव, ग्रामपंचायत कार्यालय येथे उपसरपंच श्रीकांत पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वामी समर्थ इंग्लिश मिडियम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हा बँकेच्या शाखेतही ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणापूर्वी कोरोनाच्या साथीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरी, संचालन, कवायत,भाषणं आदी कार्यक्रमांना फाटा देण्यात आला. यावेळी सरपंच संगीता कांबळे, दुष्काळ निवारण समितीचे तालुकाध्यक्ष दिलीप पवार, बळीराजा पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ तुवर, उपसरपंच श्रीकांत पवार, भारत सर्व सेवा संघाचे सचिव प्रकाश जाधव, अशोकचे संचालक दिगंबर तुवर, ग्रामविकास अधिकारी कारभारी जाधव, कामगार तलाठी गणेश जाधव, माजी उपसरपंच दत्तात्रय पाटील, माजी कामगार पोलीस पाटील रंगनाथ पवार, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब उंडे, सदस्य वामनराव तुवर, माजी सरपंच दिगंबर नांदे, मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा लुटे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जमीर शेख आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जालिंदर दिवटे यांनी केले.