जनता महाविद्यालयात भित्तीपत्रक स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:21 IST2021-04-04T04:21:54+5:302021-04-04T04:21:54+5:30

चिचोंडी पाटील : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रूईछत्तीसी येथील जनता कला व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र व प्राणिशास्त्र ...

Excitement of poster competition in Janata College | जनता महाविद्यालयात भित्तीपत्रक स्पर्धा उत्साहात

जनता महाविद्यालयात भित्तीपत्रक स्पर्धा उत्साहात

चिचोंडी पाटील : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रूईछत्तीसी येथील जनता कला व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र व प्राणिशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भित्तीपत्रक स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

संस्थेचे नवनिर्वाचित खजिनदार मुकेश मुळे यांच्या हस्ते स्पर्धा सुरू झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश बाबर होते. उपप्राचार्य डॉ. डी. एस. तळुले, विज्ञान विभागप्रमुख रविराज सुपेकर, प्रा. प्रियंका पठारे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रविराज सुपेकर यांनी केले. यावेळी मुकेश मुळे यांचा महाविद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला.

यावेळी स्वर्गीय माधवराव मुळे बहुद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने विज्ञान शाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यात विज्ञान शाखेत ८५ टक्के गुण प्राप्त करून मुलींमध्ये प्रथम आलेल्या कावेरी कोतकर व मुलांमध्ये प्रथम आलेल्या योगेश बोरूडे यांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Excitement of poster competition in Janata College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.