शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये खळबळ

By अण्णा नवथर | Updated: April 16, 2024 13:56 IST

Maharashtra Lok sabha Election 2024: अहमदनगर मतदारसंघात भाजपने डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अहमदनगरची जागा भाजप गमावणार आहे असा आरोप करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत प्रदेश कार्यालयात जाऊन राजीनामे दिले.

- अण्णा नवथर अहमदनगर - अहमदनगर मतदारसंघात भाजपने डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अहमदनगरची जागा भाजप गमावणार आहे असा आरोप करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत प्रदेश कार्यालयात जाऊन राजीनामे दिले. त्यामुळे नगर जिल्ह्यातील भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात खुलासा करण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी अहमदनगर शहरात पत्रकार परिषद घेतली. मात्र तेही उत्तरे देताना गोंधळून गेल्याचे दिसले.

भाजपचे शेवगाव तालुक्यातील पदाधिकारी सुनील रासने यांनी मुंबईत जाऊन राजीनामा दिला. खासदार विखे हे कोणाचेही फोन उचलत नाहीत. त्यांच्याबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी घालवण्यासाठी त्यांनी डाळ साखर वाटण्याचा प्रयत्न केला. भाजप देशात 400 जागा जिंकेलही मात्र नगरची जागा पक्ष गमावणार आहे. याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना चिंता वाटते. त्यामुळेच विखे यांना उमेदवारी देऊ नये अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. मात्र पक्षाने त्याची दखल घेतली नाही. अद्यापही परिस्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे आम्ही पदांचे राजीनामे देत आहोत. पक्षाचे सदस्य म्हणून कार्यरत राहू, असे रासने यांनी सांगितले. अनेक पदाधिकारी राजीनामे देत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात सविस्तर भूमिका विशद करून तसे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिले आहे.

दरम्यान, या राजीनाम्याबाबत भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी अहमदनगर येथे  मंगळवारी पत्रकार परिषद घेत खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही याबाबत काही सांगता आले नाही. 'राजीनामा हे पत्र काय आहे,  हे आम्हीच अजून पाहिलेले नाही. या पत्राची शहानिशा करून खुलासा करू ' असे ते म्हणाले. तसेच या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशचे प्रदेश सचिव अरुण मुंडे हेही उपस्थित होते. ते शेवगाव तालुक्यातील आहेत. त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनाही सविस्तर माहिती देता आली नाही. पत्रकारांनी प्रश्न विचारताच मुंडे फोन आल्याचे कारण सांगून पत्रकार परिषदेतून निघून गेले. दरम्यान, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, शेवगाव पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल. याबाबत आपण बोलणे उचित होणार नाही

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाAhmednagarअहमदनगर