वाळकी मंडलात अतिवृष्टी ; सारोळा, भोरवाडीतील बंधारे तुडुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:15+5:302021-06-09T04:26:15+5:30
केडगाव : दुष्काळी नगर तालुक्यावर यंदा पावसाची चांगलीच कृपा सुरू आहे. जेऊर परिसर वगळता पावसाची जोरदार बॅटिंग पहायला मिळत ...

वाळकी मंडलात अतिवृष्टी ; सारोळा, भोरवाडीतील बंधारे तुडुंब
केडगाव : दुष्काळी नगर तालुक्यावर यंदा पावसाची चांगलीच कृपा सुरू आहे. जेऊर परिसर वगळता पावसाची जोरदार बॅटिंग पहायला मिळत आहे. वाळकी मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली असून सारोळा कासार, भोरवाडी, अकोळनेर येथील बंधारे तुडुंब भरले आहेत.
तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या पावसाने सर्वत्र समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली आहे. जेऊर परिसराचा अपवाद सोडला तर तालुक्यात सर्वत्र चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. वाळकी मंडलात ७१.८ मिमी. पावसाची नोंद झाली. ओढे, नाले पाण्याने खळखळून वाहते झाले आहेत. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. सारोळा कासार, भोरवाडी, अकोळनेर येथील बंधारे तुडुंब भरले होते. कामरगाव, पिंपळगाव कौडा, गुंडेगाव, खडकी, बाबुर्डी बेंद, घोसपुरी तसेच आसपासच्या गावात समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला आहे. तालुक्यात आतापर्यंत ८७ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यात यंदा ६० हजार क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे नियोजन सुरू असून मूग, सोयाबीनच्या लागवडीत दुपटीने वाढणार आहे. योग्य वापसा होताच खरिपाच्या पेरणींना वेग येणार आहे. काही ठिकाणी पेरण्या सुरू आहेत. वाळकी मंडलात आतापर्यंत १४८ मिमी. तर नागापूर मंडलात १२० मिमी. पावसाची नोंद झाली. तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद जेऊर आणि भिंगार मंडलात झाली आहे.
--
मंडल निहाय पाऊस..
नालेगाव- ७६.६ मिमी., सावेडी -७६, कापूरवाडी-९२, केडगाव-८१, भिंगार-६४.८, नागापूर-१२०, जेऊर-४०.९, चिंचोडी पाटील-७८.७, वाळकी-१४८.४, चास-८८, रूईछत्तीसी-९१.४.
-----
फोटो दोन
०७ खडकी बंधारा
०७ सारोळा कासार बंधारा