आरोग्य शिबिरात १९५५ रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:01+5:302021-02-05T06:35:01+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अकोले ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने मोफत सर्व रोग निदान, दंतरोग व शस्त्रक्रिया शिबिराचे बुधवारी अकोले ग्रामीण ...

आरोग्य शिबिरात १९५५ रुग्णांची तपासणी
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अकोले ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने मोफत सर्व रोग निदान, दंतरोग व शस्त्रक्रिया शिबिराचे बुधवारी अकोले ग्रामीण रुग्णालयात आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आरोग्य सेवा नाशिक परिमंडळाचे उपसंचालक डॉ. पुनाजी गांडाळ होते.
यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजीव बेळंबे, तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी एकनाथ चाैधरी, नगरपंचायत मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभिरे उपस्थित होते.
गांडाळ म्हणाले, आपला आदिवासी व दुर्गम तालुका असल्याने या भागातील लोकांना आजाराचे निदान व उपचार मिळत नाहीत. या भागात आरोग्य विभागअंतर्गत दरवर्षी मोफत शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी तालुक्यात दोन शिबिरे होणार असून, अकोले ग्रामीण रुग्णालयात एक शिबिर झाले. पुढील शिबिर राजूर ग्रामीण रुग्णालयात होणार आहे. प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय घोगरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संदीप कडलग यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब मेहेत्रे, डॉ. राजीव घोडके, डॉ. रामनाथ दिघे, डॉ. कृष्णा वानखेडे, डॉ. सुनील साळुंके, डॉ. सुरेखा करवंदे, डॉ. अभिनव लहामटे, डॉ. अजय शिंदे उपस्थित होते.
.........
अकोलेत लवकरच उपजिल्हा रुग्णालय
सर्व कागदपत्रांची पूर्तता करून उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव सरकार दरबारी दाखल आहे. नगरविकास तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शब्द दिला असून, लवकरच तालुक्यात सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय साकारले जाईल, असा विश्वास आमदार डॉ. लहामटे यांनी व्यक्त केला.