शिबिरात १३० जणांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST2021-02-05T06:31:52+5:302021-02-05T06:31:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : शहर व तालुक्यातील पोलीस तसेच पत्रकार यांच्याकरिता मोफत सर्व रोग निदान शिबिर मंगळवारी ...

शिबिरात १३० जणांची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : शहर व तालुक्यातील पोलीस तसेच पत्रकार यांच्याकरिता मोफत सर्व रोग निदान शिबिर मंगळवारी (दि. २) पार पडले. शिबिर शहर व तालुका पोलीस ठाणे व डॉ. वाघडकर जनरल हॉस्पिटल व वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात पोलीस व पत्रकार यांच्या कुटुंबियांतील सुमारे १३० जणांची तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव, शहरचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, उपनिरीक्षक सचिन इंगळे, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष युसूफ रंगरेज, शैलेश शिंदे, हाफीज शेख, मोबीन खान, योगेश डोखे, अनिल दीक्षित, बिपीन गायकवाड, शाम गवंडी आदी पत्रकार उपस्थित होते.
या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, ई. सी. जी, खोकला, दमा, फुफ्फुसाची कार्यक्षमता तपासणी, हृदय तपासणी यासह इतरही शारीरिक तपासण्या करण्यात आल्या. यावेळी डॉ. राजेंद्र वाघडकर यांनी एक तास स्वतःसाठी आरोग्यमय जीवनासाठी या विषयावर मार्गदर्शन केले. कोविड योद्धांचा सन्मान करण्यात आला. शिबिराच्या यशस्वितेसाठी जावेद शेख, अमृत पाटील, रवी वाघडकर, अक्षय त्रिभुवन, गोविंद जाधव, विजय घोडेस्वार, तुषार पोळ, काजल बैसाणे, ऋतुजा कांबळे, विशाखा आहेर, स्नेहल साळवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
...............
फोटो-०३कोपरगाव शिबीर
030221\img-20210202-wa0082.jpg
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सर्व रोगनिदान शिबिरात तपासणी करताना सहायक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे समवेत पोलीस निरीक्षक दौलत जाधव, डॉ. राजेंद्र वाघाडकर.