गटेवाडीच्या आरोग्य शिबिरात १२० रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST2021-03-16T04:20:56+5:302021-03-16T04:20:56+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथे समुदाय आरोग्यवर्धिनीच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित केले होते. या ...

गटेवाडीच्या आरोग्य शिबिरात १२० रुग्णांची तपासणी
सुपा : पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथे समुदाय आरोग्यवर्धिनीच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात १२० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना मोफत औषधे देण्यात आल्याची माहिती गटेवाडीच्या सरपंच मंगल गट व उपसरपंच सुनील पवार यांनी दिली.
शिबिराचे उद्घाटन बन्सी बाबुराव गट व पारनेर तालुका सह दूध संघाचे व्यवस्थापक ज्ञानदेव गट यांच्या हस्ते झाले. सुपा एमआयडीसीतील कॅरिअर मायडिया या कारखान्याच्या माध्यमातून सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सुपा परिसरातील जवळपास ३० गावांतील नागरिकांची मोफत तपासणी व उपचार, मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून दिल्याचे व्यवस्थापक पंकज यादव, गौतम साबळे, नीलेश ढगे यांनी सांगितले. शिबिरासाठी डॉ.मेघना मराठे, डॉ.सपना परदेशी, सुवर्णा घोलप, सोनल लिंबजे, बाबासाहेब सांगळे, महादेव हेबांडे आदींनी परिश्रम घेतले.