तलाठीपदासाठी आज परीक्षा
By Admin | Updated: June 22, 2014 00:18 IST2014-06-21T23:58:40+5:302014-06-22T00:18:49+5:30
अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील तलाठीपदाच्या जागांसाठी उद्या (रविवारी) तलाठी पदासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत लेखी परीक्षा होणार आहे.

तलाठीपदासाठी आज परीक्षा
अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील तलाठीपदाच्या जागांसाठी उद्या (रविवारी) तलाठी पदासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत लेखी परीक्षा होणार आहे. नगर, संगमनेर व श्रीरामपूर या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाईल. त्यासाठीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली.
परीक्षेसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे सात समन्वयक, साठ उपकेंद्र प्रमुख, त्यांचे सहायक तसेच २१० पर्यवेक्षक, ८८२ समवेक्षक, ६० शिपाई नियुक्त केले आहेत. परीक्षार्थींना सकाळी १०.३० वाजता प्रवेश दिला जाईल. त्यानंतर येणाऱ्या उमेदवारास प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे़ (प्रतिनिधी)
असे आहेत केंद्र
नगरमध्ये १० केंद्रांवर १३ हजार २२४ उमेदवार, संगमनेरमध्ये १४ केंद्रांवर ४ हजार ६०८, तर श्रीरामपूरमधील १० केंद्रांवर ३ हजार ३२७ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात एकूण ६० केंद्र आहेत. याकेंद्रांवर २१ हजार १५९ उमेदवार परीक्षा देतील.