शिवजयंतीनिमित्त माजी सैनिक, कोवीड योध्दांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:31 IST2021-02-23T04:31:56+5:302021-02-23T04:31:56+5:30

राहुरी : शिवजयंतीनिमित्त तालुक्यातील निंभेरे येथे माजी सैनिक, कोवीड योध्दांचा माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात ...

Ex-serviceman, Kovid warriors felicitated on the occasion of Shiva Jayanti | शिवजयंतीनिमित्त माजी सैनिक, कोवीड योध्दांचा सत्कार

शिवजयंतीनिमित्त माजी सैनिक, कोवीड योध्दांचा सत्कार

राहुरी : शिवजयंतीनिमित्त तालुक्यातील निंभेरे येथे माजी सैनिक, कोवीड योध्दांचा माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

खा. सुजय विखे युवा मंच, अहमदनगर मराठा उद्योजक लॉबी, हिंदू राष्ट्र सेना, उद्योजक अमोल ढेपे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिवाजी पालवे, राजेंद्र औताडे, उत्तमराव दिघे, अशोक कुटे, मनोहर सिनारे महाराज, बेबीताई ढेपे, महेश आठरे यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमात बालकलाकार सौम्या संदीप खरमाळे हिने शिवरायांवर पोवाडा सादर केला.

याप्रसंगी संतोष कुटे, जयश्री कुटे, स्मिता इथापे, हिरा औटी, दीपाली खरमाळे, साईस चव्हाण, भीमराज हारदे, नानासाहेब गागरे, रविंद्र चोभे, डॉ. मयुरेश कुटे, एकनाथ ढेपे, प्रतापराव कडू, राजेंद्र सिनारे, विष्णू सिनारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Ex-serviceman, Kovid warriors felicitated on the occasion of Shiva Jayanti