साईबाबा काॅर्नर ते कोपरगाव रेल्वे स्टेशन या मंजूर रस्त्याचे काम पूर्णत्वास जात आहे. या रस्त्याच्या मध्यभागी व दोनही कडेला वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी संजीवनी फाउंडेशनने घेतली आहे. संजीवनी फाउंडेशनने बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या रस्त्यावरील दुसऱ्या टप्प्याची वृक्ष लागवड त्यांच्या हस्ते केली. या वेळी कोल्हे बोलत होते.
नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी व संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त व संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक व कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, उपनगराध्य स्वप्निल निखाडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, वैभव आढाव, रवी रोहमारे, मयूर कांडेकर, बाहासाहेब आढाव, सरपंच भीमा संवत्सरकर, राजू चांडे चंदगव्हान आदी उपस्थित होते.