प्रत्येकाने वृक्षारोपण करत संवर्धन केले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:16 IST2021-06-06T04:16:28+5:302021-06-06T04:16:28+5:30
तांबेे म्हणाल्या, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने वृक्षांचे संवर्धन केले ...

प्रत्येकाने वृक्षारोपण करत संवर्धन केले पाहिजे
तांबेे म्हणाल्या, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने वृक्षांचे संवर्धन केले जात आहे.ही वृक्षसंवर्धन संस्कृती राज्याला दिशादर्शक ठरली आहे. थोरात कारखान्याच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षांचे रोपण करून या परिसरात आणखी हिरवाई निर्माण केली जाणार आहे. प्रदूषण टाळा, पर्यावरणाचे संवर्धन करा, कोरोना संकटावर मात करण्यासाठी मास्कचा वापर करा. विनाकारण गर्दी करू नका, कोरोनाचे नियम पाळा, कोरोना हा अद्याप पूर्णपणे गेलेला नसून त्यावर संपूर्ण मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. याचबरोबर निसर्ग जर आपण चांगला राखला तर आपले आयुष्य ही चांगले होईल. असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक उपाध्यक्ष हासे यांनी केलेे. कार्यकारी संचालक घुगरकर यांनी आभार मानले. प्रा. खरात यांनी वृक्षसंवर्धनाची गीते गायली.