कोरोनाबाबतचे नियम सर्वांनीच पाळावेत; राजेंद्र फाळके यांच्या आमदारांना कानपिचक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 14:07 IST2020-06-15T14:06:30+5:302020-06-15T14:07:02+5:30
अहमदनगर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या सूचना व नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. नियम हे सर्वांसाठीच असतात. ते प्रत्येकाने पाळलेच पाहिजे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आमदार संग्राम जगताप यांना अप्रत्यक्षरीत्या कानपिचक्या दिल्या.

कोरोनाबाबतचे नियम सर्वांनीच पाळावेत; राजेंद्र फाळके यांच्या आमदारांना कानपिचक्या
अहमदनगर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या सूचना व नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. नियम हे सर्वांसाठीच असतात. ते प्रत्येकाने पाळलेच पाहिजे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आमदार संग्राम जगताप यांना अप्रत्यक्षरीत्या कानपिचक्या दिल्या.
येथील राष्ट्रवादी भवनात फाळके पत्रकारांशी बोलत होते. मास्क वापरले नाहीत, नियमांचे पालन न केल्याने शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. याबाबत पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, कोणी असो. सर्वांना नियम पाळणे बंधनकारक आहे. ते नाकारून चालणार नाही. परंतु याचीच दुसरी बाजू अशी आहे की, कार्यकर्त्यांच्या उत्साहापोटी त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम घेतला असावा. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला त्यांनी आवर घालावा. तसेच येथील बूथ हॉस्पिटलला आर्थिक मदत करणारे आमदार जगताप आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यांची ही भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी केलेली मदतही कौतुकास्पद आहे.