लोकशाहीसाठी मतदानाचा प्रत्येकाने हक्क बजवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:15 IST2021-07-19T04:15:17+5:302021-07-19T04:15:17+5:30
जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र व जय युवा अकॅडमीच्या वतीने आयोजित मतदार जागृती अभियानाच्या शुभारंभप्रसंगी अॅड. ...

लोकशाहीसाठी मतदानाचा प्रत्येकाने हक्क बजवावा
जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र व जय युवा अकॅडमीच्या वतीने आयोजित मतदार जागृती अभियानाच्या शुभारंभप्रसंगी अॅड. लगड बोलत होते. नेहरू युवा केंद्र येथे शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अॅड. भानुदास होले, अॅड. महेश शिंदे, अॅड. अनिता दिघे, अॅड. सुनील तोडकर, बनकर, डॉ. धीरज ससाणे, संध्या जोशी, रमेश गाडगे, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाभर जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) यांच्या माध्यमातून कोरोना नियमावलीचे पालन करून वर्षभर मतदार जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ करून वेबिनारद्वारे विविध स्वयंसेवी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी ॲड. लगड यांनी लोकशाहीतील मतदान प्रक्रियेचे महत्त्व विशद केले. यावेळी ॲड. होले, ॲड. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांनी युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमात विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
फोटो - १९ शिबिर
ओळी- मतदार जागृती अभियानात मार्गदर्शन करताना अॅड. सुरेश लगड. समवेत अॅड. भानुदास होले, अॅड. महेश शिंदे, अॅड. अनिता दिघे आदी.