‘अहमदनगर’ नव्हे, ‘अंबिकानगर’ म्हणा ! - संभाजी भिडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 13:49 IST2018-06-10T12:51:56+5:302018-06-10T13:49:09+5:30
अहमदनगरचा उल्लेख करताना ‘अहमदनगर’ करु नका. त्याऐवजी ‘अंबिकानगर’ असे म्हणा, असे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सभेत सांगितले. नगर शहराच्या नामांतराचा प्रस्तावच त्यांनी सभेत मांडला. अहमदनगरमधील टिळक रोड येथील सभेत भिडे बोलत होते.

‘अहमदनगर’ नव्हे, ‘अंबिकानगर’ म्हणा ! - संभाजी भिडे
अहमदनगर : अहमदनगरचा उल्लेख करताना ‘अहमदनगर’ करु नका. त्याऐवजी ‘अंबिकानगर’ असे म्हणा, असे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सभेत सांगितले. नगर शहराच्या नामांतराचा प्रस्तावच त्यांनी सभेत मांडला. अहमदनगरमधील टिळक रोड येथील सभेत भिडे बोलत होते.
भिडे म्हणाले, आपणाला हिंदू असल्याचा अभिमान असला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक हिंदूने रामायण, महाभारत आणि मराठ्यांचा इतिहास वाचलाच पाहिजे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे ३२ मनाचे सिंहासन सव्वा वर्षात उभारण्यात येणार आहे. हे सिंहासन उभारून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.