शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकांसाठी जीव गेला तरी बेहत्तर, उपोषण सोडणार नाही; लंकेनी स्पष्टच सांगितलं

By साहेबराव नरसाळे | Updated: December 8, 2022 14:43 IST

तिघांची प्रकृती बिघडली : मेडिकलमधून औषधे आणून पुन्हा उपोषण सुरू

अहमदनगर : आमदार निलेश लंके यांचे उपोषण सुरू होऊन 24 तास उलटून गेले आरोग्य पथक उपोषणकर्त्यांची तपासणी करण्यासाठी आले नाही. रुग्णवाहिकेचीही व्यवस्था केली नाही. प्रशासनाकडून आमचे उपोषण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

कोरोनाकाळात जीवाची पर्वा न करता सेवा केली. आताही लोकसेवेत जीव गेला तरी बेहत्तर पण उपोषण सोडणार नाही, असा निर्धार आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.आज दुपारी लंके यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात लोकप्रतिनिधींचे  उपोषण सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांना आमच्याकडे येण्यास वेळ मिळाला नाही. त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे. आरोग्य पथकही आमच्यापर्यंत पोहोचू दिले जात नाही. अधिकाऱ्यांना आमची भेट घेऊ दिली जात नाही. एकूणच आमचे उपोषण मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

सुरक्षा व्यवस्थाही नाही

रात्री उपोषण मांडवातच आमदार निलेश लंके यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी रात्र काढली. रस्त्याकडेला हे उपोषण सुरू असताना रात्री उपोषण स्थळी प्रशासनाने कोणताही बंदोबस्त ठेवला नव्हता. 

आरोग्य पथकाला कोणी अडवले

लोकप्रतिनिधी उपोषणाला बसलेले असताना जिल्हा रुग्णालयाकडून एक आरोग्य पथक उपोषणस्थळी तैनात असायला हवे होते. पण हे आरोग्य पथक कोणी अडविले, असा सवालही उपोषणकर्त्यांनी केली.

उपोषणस्थळी एकही सुविधा मिळू दिली जात नाही. येथे हजारो लोक येत आहेत. पण प्रशासनाने येथे पाणी, शौचालय याची व्यवस्था करणे आवश्यक होते. कायद्यात तशी तरतूद आहे. पण आंदोलनकर्त्यांना काहीही सुविधा मिळू दिल्या जात नाही, असा आरोप आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड यांनी केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरagitationआंदोलनNCPराष्ट्रवादी काँग्रेस