निवडणूक रिंगणात उतरण्याआधीच तरुणाईत रंगतोय कलगीतुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST2020-12-27T04:16:11+5:302020-12-27T04:16:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच तरुणाईत उत्साह संचारला आहे. सोशल मीडियाच्या ...

निवडणूक रिंगणात उतरण्याआधीच तरुणाईत रंगतोय कलगीतुरा
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच तरुणाईत उत्साह संचारला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपाल्या नेत्याची ध्वनिचित्रफीत तयार करून निवडणूक प्रचारासाठी उपयुक्त शब्द रचना असणाऱ्या पार्श्वगीताच्या ओळीचा वापर करत निवडणूक वातावरण निर्मितीत तरुणाई मग्न झाली आहे. या माध्यमातून आवडता गावपुढारी, निवडणूक लढवू इच्छिणारा मित्र, कुटुंबातील सदस्य निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे संकेत या माध्यमातून दिले जात आहेत.
नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात २३ डिसेंबरपासून झाली. सुरुवातीच्या दोन दिवसांत फक्त नऊ गावांतील २९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. राजकीय नेते आपापली रणनीती ठरविण्यात गुंतलेले आहेत. अजून निवडणूक लढतीचे चित्रही स्पष्ट झालेले नाही
ही आहेत लक्षवेधी गीते...
वातावरण निर्मितीत प्रामुख्याने समाविष्ट असलेली काही निवडक लोकप्रिय गीते अशी : संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के, गगन कहे विजय भव, विजय भव गगन कहे विजय भव... यासह आपल्या नेत्याचा प्रभाव व्यक्त करण्यासाठी हो हो तो पत्ता करतो, गुल पावरफुल
पत्ता करतो, गुल पावरफुल हाय आमचा नेता, लय पावरफुल.. काव्यपद वापरण्यात येते. त्याला विरोधकाचे प्रत्युत्तरही तेवढेच दमदार मिळताना दिसते. आपले कॉन्टॅक्ट जबर, तुला नाय खबर, कधी काळी ढगात जाशील, नाड्याच्या वार्ता करू नको, तू फोटोत चिपकून राहशील, दोस्तांच्या मनातला दिलदार राजा मी पॉवर दमदार आहे किंवा धुरळा धुरळा धुरळा रं धुरळा धुरळा धुरळा कर लेका, नजर धारदार माणूस दमदार, राजाचं जिगर पब्लिक फिगर धुरळा.