बड्या नेत्यांचाही लागणार कस..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:35 IST2020-12-16T04:35:26+5:302020-12-16T04:35:26+5:30

राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्के (टाकळी काझी), भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे (चिंचोडी ...

Even big leaders will have to work hard. | बड्या नेत्यांचाही लागणार कस..

बड्या नेत्यांचाही लागणार कस..

राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला

नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्के (टाकळी काझी), भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे (चिंचोडी पाटील), भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या गावांत निवडणुका होणार असल्याने त्या लक्षवेधक ठरणार आहेत.

...

हिवरेबाजारला ३० वर्षांची बिनविरोधची परंपरा

ग्रामविकासात देशभर झळकलेल्या आदर्श गाव हिवरेबाजारला ३० वर्षांपासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. यंदाही परंपरा टिकून राहते की, परंपरा खंडित होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

...

आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये १९९० पासून निवडणूक बिनविरोध होते. यात सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न असतो. कोणी नाराज राहणार नाही. लोकशाही टिकून राहवी, यासाठी प्रयत्न करणार आहोत.

-पद्मश्री पोपटराव पवार, हिवरेबाजार, ता. नगर

..

Web Title: Even big leaders will have to work hard.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.