बडग्यानंतरही वाळूउपसा सुरूच

By Admin | Updated: July 4, 2016 23:47 IST2016-07-04T23:37:19+5:302016-07-04T23:47:13+5:30

अकोले : महसूल विभागाने तालुक्यातील वाळू तस्करीच्या मुसक्या आवळण्यासाठी कारवाईचा बडगा उचलला असून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर दंडासह ‘आरटीओ’कडून कारवाई केली आहे.

Even after the rebellion, sand continues | बडग्यानंतरही वाळूउपसा सुरूच

बडग्यानंतरही वाळूउपसा सुरूच


अकोले : महसूल विभागाने तालुक्यातील वाळू तस्करीच्या मुसक्या आवळण्यासाठी कारवाईचा बडगा उचलला असून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर दंडासह ‘आरटीओ’कडून कारवाई केली आहे. मात्र वाळू तस्करीला आळा बसला नाही. उलटपक्षी अवैध वाळू व्यवसायाला बरकत आली असून महसूल विभाग कारवाई करताना दुजाभाव करत असल्याचे बोलले जात आहे.
चालू आर्थिक वर्षात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर तहसीलदारांच्या पथकाने कारवाई केली. दंडाची रक्कम भरूनही वाळू तस्करी आटोक्यात येताना दिसत नाही. अवैध वाळूवर कारवाई करताना दुजाभाव केला जात असल्याची व कोतूळ, राजूर, देवठाण भागातील अवैध वाळूबाबत नरमाईचे धोरण घेतले जात असल्याची चर्चा तहसील परिसरात आहे. वाहनांतील वाळूचे मोजमाप करतानाही दुजाभाव केला जातो.तालुक्यात प्रवरा नदीपात्रातील वाळू काढण्यासाठी कळस बुद्रुक येथील दोन, तर कुंभेफळ येथील एका ठिकाणचा महसूल प्रशासनाकडून अद्याप लिलाव झालेला नाही. तरी अकोल्यात पावसाळ्याच्या तोंडावर वाळू साठे वाढले कसे, असा प्रश्न आहे. दरम्यान गौणखनिजाच्या दंडात्मक कारवाईच्या रकमेत तिपटीने वाढ झाली आहे. मार्च २०१६ अखेर एकूण ७० वाहनांवर कारवाई करून ३३ लाख ९३ हजार ५२८ रुपये दंड वसूल करण्यात आला. मात्र एकाही वाहनावर आरटीओची कारवाई दाखवण्यात आली नाही. या महसूल वर्षात सात गाड्यांवर आरटीओची कारवाई करण्यात आल्याने दंडाचा आकडा मोठा दिसत आहे. वाळू वाहतुकीसाठी आता गाढवांचा उपयोग होत आहे. महसूल वाहनांवर कारवाई करते, पण आता गाढवांवर कशी कारवाई करायची, अशा पेचात प्रशासन आहे. (तालुका प्रतिनिधी)
अवैध वाळू रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम हाती घेतली असून लवकरच अवैध वाळूला तालुक्यात पूर्ण आळा बसेल. या महसूल वर्षात सात वाहनांवर गौणखनिजच्या नियमाप्रमाणे ‘दंडाची’ व ‘आरटोओ’ कारवाई करण्यात आली आहे. दंड आकारताना कोणताही दुजाभाव केला जात नाही. समन्याय कारवाई सुरू आहे.
- जगदीश गाडे, नायब तहसीलदार

Web Title: Even after the rebellion, sand continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.