नव्वदीनंतरही आत्मविश्वास दांडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:25+5:302021-06-09T04:25:25+5:30
जिल्ह्यात पहिल्या लाटेत ७५ हजार बाधित झाले, तर दुसऱ्या लाटेत दीड लाखांच्यावर ही संख्या पोहोचली. पहिल्या लाटेत नव्वदी पार ...

नव्वदीनंतरही आत्मविश्वास दांडगा
जिल्ह्यात पहिल्या लाटेत ७५ हजार बाधित झाले, तर दुसऱ्या लाटेत दीड लाखांच्यावर ही संख्या पोहोचली. पहिल्या लाटेत नव्वदी पार केलेल्या वृद्धांचे प्रमाण हे ५ ते १० टक्के होते, तर दुसऱ्या लाटेत हे प्रमाण ५ टक्के होते. दुसऱ्या लाटेत वृद्धांची त्यांच्या कुटुंबीयांनी चांगली काळजी घेतल्याचे दिसते आहे. तसेच त्यांना घराबाहेरही पाठवले नसल्याचे दिसून आले आहे. तसेच घरातील वृद्धांना स्वतंत्र खोलीत ठेवून त्यांच्या संपर्कात न जाण्याची कुटुंबीयांनी काळजी घेतल्याचे दिसते आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत हे प्रमाण कमी झाल्याचे दिसते आहे.
------------
अशी आहे आकडेवारी
पॉझिटिव्ह
पहिल्या लाटेत- ३५००
दुसऱ्या लाटेत-४५००
---
मृत्यू
पहिल्या लाटेत-३००
दुसऱ्या लाटेत-४००
-----
५० ते ६० वयोगटात सर्वाधिक मृत्यू
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही मृत्यू झालेल्यांचा वयोगट हा ५० ते ६० हाच सर्वाधिक होता. याच वयोगटातील सर्वाधिक व्यक्ती कोरोनाचे बळी ठरले. कोरोना पॉझिटिव्ह आणि आधीचे आजार यामुळे त्यांचे मृत्यू सर्वाधिक होते, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
-------------
आम्हाला कोणीच हरवू शकत नाही............
रक्तातील साखर, रक्तदाब, संधीवात, गुडघे फ्रॅक्चर, त्यात कोरोना झाला. एचआरसीटी १५ आला. मात्र मन खंबीर असल्याने ऑक्सिजन पातळी ९५ च्या खाली येऊ दिली नाही. आठ दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेतले. घरच्यांना आता माझे संपले असेच वाटत होते, मात्र मी हार मानली नाही. कोरोना झाल्यावरही माझे हाताचे ऑपरेशन झाले. आजही मी ठणठणीत आहे. मन खंबीर होते, आपल्याला काही होणार नाही, याची खात्री होती.
-बबई हौशिनाथ पोपळघट, स्वातंत्र्यसैनिक, राहुरी (वय ९२)
-----------------
कधी दवाखाना पाहिला नाही. किरकोळ औषध कधीतरी घेतले. मात्र कोरोनाने छळले होते. सुरुवातीला श्वास घेण्याचा खूप त्रास होत होता. खासगी दवाखान्यात दाखल झाले. तेथील डॉक्टरांनी चांगले उपचार केले. त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आपल्याला काही होणार नाही ही भावना, चांगले उपचार, कुटुंबीयांची साथ यामुळे एकदम ठणठणीत आहे.
-लक्ष्मीबाई डोके, सावेडी, नगर (वय १००)
---------------
डमी आहे.