मुदत संपूनही ५४ हजार जणांनी घेतला नाही दुसरा डोस - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:52+5:302021-09-02T04:45:52+5:30

अहमदनगर : कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवत १८ वर्षांपुढील सर्वांनाच लस देण्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर लसीकरण केंद्रांवर सध्या गर्दी दिसत ...

Even after the deadline, 54,000 people did not take the second dose - A | मुदत संपूनही ५४ हजार जणांनी घेतला नाही दुसरा डोस - A

मुदत संपूनही ५४ हजार जणांनी घेतला नाही दुसरा डोस - A

अहमदनगर : कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवत १८ वर्षांपुढील सर्वांनाच लस देण्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर लसीकरण केंद्रांवर सध्या गर्दी दिसत आहे. मात्र, दुसरीकडे मुदत संपूनही अनेकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. नगर जिल्ह्यात मागील आठवड्यात असे लस न घेणारे ५४ हजार लोक होते. त्यांना शोधून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना लसीकरण केंद्रांना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

कोविडच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे मृत्यूचा आकडाही वाढला होता. परिणामी कोरोनापासून बचावासाठी भीतीपोटी अनेकांनी लस घेण्याकरिता धावपळ केली. अनेक लसीकरण केंद्राबाहेर लोक गर्दी करत होते. आता मात्र कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने लसीकरणाकडे अनेकांनी पाठ केल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला अशांना ८४ दिवसांनंतर, तर कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना २८ दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे. ही मुदत पूर्ण करूनही नगर जिल्ह्यातील सुमारे ५४ हजार लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही. मागील आठवड्यातील ही आकडेवारी आहे. लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तुलनेने लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या रोजच्या अहवालात कमी दिसून येत आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत केले जात आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर मुदत संपूनही ज्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही, अशांचे संपर्क क्रमांक व नावे शोधून संबंधित लसीकरण केंद्रांना देण्यात आली आहेत. अशा लोकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

---------------लस दुसऱ्या डोससाठीची मुदत

कोविशिल्ड ८४ दिवस

कोव्हॅक्सिन २८दिवस

-----------

जिल्ह्यात झालेले लसीकरण (ग्राफ)

पहिला डोस -१२,२४,४२५

दुसरा डोस -४,८३,९२७

----------

दुसरा डोसही तितकाच आवश्यक

कोरोनापासून बचावासाठी लसीचा पहिला डोस घेतला म्हणून कोणी पूर्णत: सुरक्षित नाही. लसीचे दोन्ही डोस घेऊनही अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे आकडे सांगतात. मात्र, त्यांना कोरोनाचे गंभीर लक्षणे दिसून आले नाहीत. त्यामुळे केवळ पहिला डोस घेऊन लसीकरणाकडे पाठ न करता मुदतीमध्ये लसीचा दुसरा डोसही घेणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-------------------

Web Title: Even after the deadline, 54,000 people did not take the second dose - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.