राहुरी तालुका ग्रंथालय संघाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:36 IST2021-02-05T06:36:19+5:302021-02-05T06:36:19+5:30

राहुरी तालुक्यात एकूण ३७ ग्रंथालये असून एकमताने संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली. ...

Establishment of Rahuri Taluka Library Association | राहुरी तालुका ग्रंथालय संघाची स्थापना

राहुरी तालुका ग्रंथालय संघाची स्थापना

राहुरी तालुक्यात एकूण ३७ ग्रंथालये असून एकमताने संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली. देसवंडी येथील लोकमान्य सार्वजनिक वाचनालयाचे दादासाहेब शिरसाठ यांची अध्यक्षपदी, तर बाभुळगांव येथील कदमराव पवार सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संभाजी पवार यांची प्रमुख कार्यवाहपदी निवड करण्यात आली.

कार्यकारिणी अशी - खजिनदार - प्रा.संजय तमनर (तमनर आखाडा) तर शिवाजी घाडगे (श्री शिवाजीनगर), अश्विनी मालपाणी (राहुरी खुर्द), प्रशांत हराळ (ब्राम्हणी), संभाजी वाळके (देवळाली प्रवरा), संजय सिनारे (चांदेगाव), रघुनाथ नालकर (कणगर), बाळासाहेब गागरे (कानडगाव) यांची कार्यकारी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी राळेगण सिध्दीत घडवलेला कायापालट व आदर्श गाव विकासाची माहिती शब्दबद्ध केलेले ‘अनुभवाचे बोल’ व ‘राळेगण सिध्दी एक परिचय’ ही पुस्तके ग्रंथालयांना आजच्या कार्यक्रमात अण्णा हजारे यांच्यावतीने देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथमित्र मुरलीधर नवाळे हे होते.

याप्रसंगी सुरेश हराळ, संभाजी पवार, अनिल नवले, संजय सिनारे, रघुनाथ नालकर, मुरलीधर नवाळे, बाबुराव घाडगे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन प्रा. संजय तमनर यांनी केले. आभार सुरेश हराळ यांनी मानले.

..

राहुरी तालुक्यातील ग्रंथालयांना पुस्तके प्रदान करण्यात आली. यावेळी ग्रंथमित्र मुरलीधर नवाळे, दादासाहेब शिरसाठ, सुरेश हराळ, संभाजी पवार, अनिल नवले, संजय सिनारे आदी उपस्थित होते.

..

फोटो-२५राहुरी ग्रंथालय

...

Web Title: Establishment of Rahuri Taluka Library Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.