म्युकरमायकोसिस, बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:24+5:302021-06-02T04:17:24+5:30
म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून डॉ. गणेश झगडे तर बालरोग टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉ. विकास शिंदे यांची निवड करण्यात ...

म्युकरमायकोसिस, बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन
म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून डॉ. गणेश झगडे तर बालरोग टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉ. विकास शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
तालुक्यात संभाव्य म्युकरमायकोसिस व कोरोना संसर्गाच्या लहान मुलांमध्ये होणार्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा विशेष कार्यदल (टास्क फोर्स) तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी स्थापन केला आहे. यामध्ये ११ तज्ज्ञ खाजगी डॉक्टर सदस्य असून वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी सदस्य सचिव असणार आहेत.
जामखेड तालुक्यात म्युकरमायकाेसिसचे रुग्ण अद्याप नसून, संभावित म्युकरमायकोसिस व तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे यावर नियंत्रण, निदान, उपचार व मार्गदर्शन करण्यासाठी हा टाक्स फोर्स स्थापन करण्यात आला आहे.
म्युकरमायकोसिस टास्क फोर्स अध्यक्ष म्हणून नेत्रतज्ज्ञ डॉ. गणेश झगडे, तर सदस्यपदी डॉ. अविनाश मुंडे, डॉ. रोहन टोमके, डॉ. सूरज तौर, डॉ. आनंद लोंढे, डॉ. राजकुमार गायकवाड, डॉ. सागर शिंदे, सचिव म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांची निवड करण्यात आली आहे. बालरोग टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ. विकास शिंदे, तर सदस्य म्हणून डॉ. प्रताप चौरे, डॉ. सुहास सूर्यवंशी, डॉ. महेश गोडगे, सचिव म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे हे असणार आहेत.