मुलींच्या स्वप्नावर निबंध, चित्र स्पर्धा
By Admin | Updated: October 16, 2016 01:03 IST2016-10-16T00:32:42+5:302016-10-16T01:03:15+5:30
अहमदनगर : लोकमत बालविकास मंचच्या वतीने ‘इंटरनॅशनल डे फॉर गर्ल चाईल्ड’ निमित्ताने निबंध लेखन, पेंटिंग आणि सेल्फी विथ डॉटर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुलींच्या स्वप्नावर निबंध, चित्र स्पर्धा
अहमदनगर : लोकमत बालविकास मंचच्या वतीने ‘इंटरनॅशनल डे फॉर गर्ल चाईल्ड’ निमित्ताने निबंध लेखन, पेंटिंग आणि सेल्फी विथ डॉटर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘गिव्ह विंग टु ड्रिम आॅफ गर्ल्स’ हा निबंध स्पर्धेचा विषय आहे. तर पेंटिंग स्पर्धेचा विषय ‘कलर ड्रीम आॅफ गर्ल्स’ हा ठेवण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५० हजार रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात येणार आहेत. दोन्ही स्पर्धांत प्रथम पुरस्काराच्या रूपाने रोख ५ हजार, ३ हजार आणि २ हजार आणि प्रोत्साहनपर पाच स्पर्धकांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत. दोन्ही स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांचे ६ ते १२ आणि १३ ते १८ असे दोन वयोगट ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थी आपले निबंध आणि पेंटिंग २१ आॅक्टोबरपर्यंत इव्हेंट विभाग, लोकमत भवन, पत्रकार चौक, सावेडी रोड, अहमदनगर या पत्त्यावर पाठवू शकतात. विद्यार्थ्यांनी आपले निबंध आणि पेंटिंगसोबत आपला वर्ग, शाळा, वय, नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी माहिती टाकणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी ९८५०३०२८०२ किंवा ९८५०२६४२०० या क्रमांकांवर संपर्क साधावा. स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली व विनामूल्य असणार आहे.