दोन चिमुकल्यांसह पत्नीचे प्रियकरासह पलायन

By Admin | Updated: June 14, 2016 23:20 IST2016-06-14T23:13:49+5:302016-06-14T23:20:17+5:30

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील एका परप्रांतीय महिलेने दोन चिमुकल्यांसह प्रियकराबरोबर धूम ठोकली आहे. आपली दोन मुले मिळावीत म्हणून वडिलांनी आठ दिवसांपासून अन्नत्याग केला आहे.

Escape with wife and wife of two sparrows | दोन चिमुकल्यांसह पत्नीचे प्रियकरासह पलायन

दोन चिमुकल्यांसह पत्नीचे प्रियकरासह पलायन

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील एका परप्रांतीय महिलेने दोन चिमुकल्यांसह प्रियकराबरोबर धूम ठोकली आहे. आपली दोन मुले मिळावीत म्हणून वडिलांनी आठ दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. ८ जून रोजी ही घटना घडली.
सामाजिक कार्यकर्त्या चांदणी खेतमाळीस यांनी ही घटना कथन केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक विजय लगारे गहिवरले. त्यांनी पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांना तपास करण्याविषयी सूचना दिल्या. त्यामुळे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. ही महिला पारनेर, पुणे किंवा नगर येथे असण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक कडनोर यांनी पोलीस निरीक्षक अशोक उकिरडे यांना तपासासाठी पोलिसांची मदत दिली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा शहरातील दोघांची चौकशी करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Escape with wife and wife of two sparrows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.