पारगाव मौलात सुसज्ज अमरधाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:22 IST2021-07-28T04:22:34+5:302021-07-28T04:22:34+5:30
रुईछत्तीशी : पारगाव मौला (ता.नगर) येथे पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य रवींद्र भापकर यांच्या पुढाकारातून सुसज्ज अमरधाम ...

पारगाव मौलात सुसज्ज अमरधाम
रुईछत्तीशी : पारगाव मौला (ता.नगर) येथे पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य रवींद्र भापकर यांच्या पुढाकारातून सुसज्ज अमरधाम उभारण्यात आले आहे. या अमरधामसाठी पंचायत समितीकडून त्यांनी २ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करून आणला.
पारगाव मौला येथे उभारण्यात आलेल्या अमरधामची पाहणी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, रवींद्र भापकर यांनी नुकतीच केली. अमरधामच्या उर्वरित कामासाठी अजूनही निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी सरपंच डॉ.धर्मनाथ बोठे, शिवाजी बोठे, सुनील बोठे, अर्जुन बोडखे, नवनाथ बोठे, भगवान बोडखे, लक्ष्मण बोडखे, भाऊ पांडुळे, पंढरीनाथ खेडकर, रमेश खेडकर, वैभव बोठे आदी उपस्थित होते. यावेळी हराळ म्हणाले, रवींद्र भापकर यांनी १४ गावांत विविध कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. व्यक्तिगत लाभाची अनेक कामे त्यांनी मार्गी लावली आहेत.