उद्योजकांनी सुविधांचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:20 IST2021-03-31T04:20:45+5:302021-03-31T04:20:45+5:30

कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत इस्टेट सोसायटीची ६०वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच ऑनलाईन पार पडली. या सभेप्रसंगी अध्यक्षपदावरून कोल्हे बोलत ...

Entrepreneurs should take advantage of the facilities | उद्योजकांनी सुविधांचा लाभ घ्यावा

उद्योजकांनी सुविधांचा लाभ घ्यावा

कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत इस्टेट सोसायटीची ६०वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच ऑनलाईन पार पडली. या सभेप्रसंगी अध्यक्षपदावरून कोल्हे बोलत होते. सदर सभेतील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. तसेच औद्योगिक वसाहतीमधील उद्योगात भरारी घेतलेल्या उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मुनीष ठोळे, संचालक मनोज अग्रवाल, अनिल सोनवणे, केशव भवर, पराग संधान, रवींद्र नरोडे, पंडित भारुड, चंद्रशेखर आव्हाड, सुकृत शिंदे, रवींद्र आढाव, ऐश्वर्यलक्ष्मी सातभाई, शिमला सारदा, रोहित वाघ, प्रशांत होन, सोमनाथ निरगुडे, सहाय्यक निबंधक यांच्यासह आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण ऑनलाईन सभेत सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन संचालक पंडित भारुड, व्यवस्थापक एस. डी. लोखंडे यांनी केले. संचालक केशव भवर यांनी आभार मानले.

Web Title: Entrepreneurs should take advantage of the facilities