उद्योजकाची मढेवडगावच्या शाळांना दोन लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:16+5:302021-02-05T06:28:16+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील मढेवडगाव येथील दिव्यांग युवा उद्योजक अंबादास गायकवाड यांनी वडील नारायण गायकवाड यांच्या स्मरणार्थ व अमृतलाल ...

उद्योजकाची मढेवडगावच्या शाळांना दोन लाखांची मदत
श्रीगोंदा : तालुक्यातील मढेवडगाव येथील दिव्यांग युवा उद्योजक अंबादास गायकवाड यांनी वडील नारायण गायकवाड यांच्या स्मरणार्थ व अमृतलाल गुगळे यांनी मुलाच्या स्मरणार्थ न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी प्रत्येकी १ लाख १ हजार १११ रुपये, इतर प्राथमिक शाळांना एक लाखाचे फर्निचर भेट दिले आहे. अंबादास गायकवाड यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेस दीड हजार लिटरची पाण्याची टाकी, महादेव वस्ती प्राथमिक शाळेस एलईडी टीव्ही संच, गोरे मळा प्राथमिक शाळेस २ टेबल ६ खुर्च्या, इरिगेशन काॅलनी प्राथमिक शाळेस १२ खुर्च्या, शिंदे-उंडे मळा प्राथमिक शाळेस १२ खुर्च्या भेट दिल्या. आपण शिकलेल्या शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल व गावातील इतर प्राथमिक शाळांना मदत करण्याचा निर्णय घेतला. यापुढे शैक्षणिक कामात मदत करणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.
फोटो : ३० अंबादास गायकवाड