इंग्रजी शाळा अन शिकवणी हे समीकरणच
By Admin | Updated: June 30, 2014 00:35 IST2014-06-29T23:31:07+5:302014-06-30T00:35:10+5:30
अहमदनगर : अलिकडच्या काही वर्षांत आपला पाल्य इंग्रजी शाळेतच असावा असा जणू अलिखित नियमच बनला आहे. इच्छा नसली तरी समाजातील वाढती स्पर्धा लक्षात घेता इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल

इंग्रजी शाळा अन शिकवणी हे समीकरणच
अहमदनगर : अलिकडच्या काही वर्षांत आपला पाल्य इंग्रजी शाळेतच असावा असा जणू अलिखित नियमच बनला आहे. इच्छा नसली तरी समाजातील वाढती स्पर्धा लक्षात घेता इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल दिसून येत आहे. इंग्रजी शाळेतील विद्यार्थी आणि शिकवणी असे समीकरणच बनले आहे. ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ८२ टक्के मुलांच्या पालकांनी पाल्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असल्याने शिकवणी लावल्याचे म्हटले आहे.
पाल्य जसजसा वरच्या वर्गात जाईल तसा त्यांचा शिकवणीचा वेळही वाढत जातो.
मुलांना अभ्यासाची सवय लागावी, किंबहुना आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहावे, यासाठी त्याला जास्तीत-जास्त पुरक शिक्षण दिले जाते. मग या पुरक शिक्षणासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबले जेतात. योग्य शाळा लावणे, घरी वेळच्या-वेळी अभ्यास घेणे, त्याचबरोबर पाल्यास योग्य शिकवणी लावणे याचे प्रमाण वाढत आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे केजीपासूनच मुलांना शिकवणीला पाठविले जाते.
मुले इंग्रजी माध्मयात शिकत असल्याने शिकवणी लावत असल्याचे अनेक पालकांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणानुसार केजी ते इयत्ता चौथीपर्यंत शिकवणी लावण्याचे हे प्रमाण ४५ टक्के आहे. ३० टक्के आठवी ते दहावीतील मुले शिकवणीला जातात. इंग्रजी माध्यमामुळे शिकवणी लावली असल्याचे तब्बल ८२ टक्के पालकांनी सांगितले आहे.
बदलत्या अभ्यासक्रमामुळे मुलांना शिकवणी लावणे गरजचे झाले आहे. पुढच्या वर्गात जाण्याबरोबरच त्यांचा अभ्यासही वाढत जातो. आठवी व नववी हा दहावीचा पाया मानला जातो म्हणून शिकवणीची गरज पडते. पण, ज्युनियर-सिनियर के .जी. पासूनच मुलांनाही शिकवणी लावण्याचे प्रमाण मोठे असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होते. (प्रतिनिधी)
...तरीही असमाधानी
शिकवणी लावण्यामागे, आपल्या पाल्याची गुणवत्ता वाढावी हा प्राथमिक उद्देश असतो. परंतु, सर्वेक्षणादरम्यान असे दिसून आले, की शिकवणी लावूनही मुलांच्या गुणवत्तेत समाधानकारक वाढ झालेली नाही. तब्बल ३५ टक्के मुलांना शिकवणी लावूनसुद्धा मुलांच्या गुणवत्तेत काही प्रमाणात वाढ झाली आहे, तर ५ टक्के पालकांनी शिकवणी लावूनही मुलांमध्ये काही बदल झाला नसल्याचे सांगितले.