व्यापारी संकुलाभोवतीच अतिक्रमण

By Admin | Updated: January 14, 2016 23:03 IST2016-01-14T22:39:11+5:302016-01-14T23:03:56+5:30

शिर्डी : साई मंदिरालगत असलेल्या साई कॉम्प्लेक्सला अतिक्रमणांच्या पडलेल्या विळख्याने त्रस्त झालेल्या व्यावसायिकांनी गुरूवारी आपले व्यवसाय बंद करून नगरपंचायतमध्ये येऊन आपले गाऱ्हाणे मांडले़

Encroachments around the merchant package | व्यापारी संकुलाभोवतीच अतिक्रमण

व्यापारी संकुलाभोवतीच अतिक्रमण

शिर्डी : साई मंदिरालगत असलेल्या साई कॉम्प्लेक्सला अतिक्रमणांच्या पडलेल्या विळख्याने त्रस्त झालेल्या व्यावसायिकांनी गुरूवारी आपले व्यवसाय बंद करून नगरपंचायतमध्ये येऊन आपले गाऱ्हाणे मांडले़
साई मंदिरालगत साई कॉम्प्लेक्स हे नगरपंचायतचे व्यापारी संकुल आहे़या संकुलात जवळपास अडीचशे व्यावसायिक आहेत़ या संकुलाची रचना गुंतागुतीचे आहे.त्यातच नगरपंचायतचे अव्वाच्या सव्वा भाडे व अन्य करांमुळे अनेकांनी व्यवसायच बंद केले आहेत़ या संकुलाला गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणांचा विळखा पडलेला आहे़ या अतिक्रमणधारकांनी संस्थानच्या जागेत त्यांच्या स्टॉलच्या समोर अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केले़ नगरपंचायतचा अतिक्रमणविरोधी विभागही तसेच संस्थानचा सुरक्षा विभागही या अतिक्रमणाकडे डोळेझाक करत होता़ त्या पार्श्वभूमीवर त्रस्त झालेल्या व्यावसायिकांनी गुरूवार असूनही आपले व्यवसाय बंद केले व नगरपंचायतच्या सत्ताधारी गटाचे नेते व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला़ दरम्यान मुख्य लिपीक एम़बी़देसले व कार्यालयीन अधीक्षक ताकपिरे यांनी तातडीने अतिक्रमण पथकास पाचारण करून ही अतिक्रमणे काढण्याचे व यापुढे अतिक्रमणे होऊ नये याकरता कठोर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याने व्यावसायिकांनी पुन्हा आपली दुकाने उघडली़

Web Title: Encroachments around the merchant package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.