अतिक्रमण केल्याने तिघांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द

By Admin | Updated: October 16, 2016 01:09 IST2016-10-16T00:41:48+5:302016-10-16T01:09:53+5:30

अहमदनगर : शासकीय जागेत अतिक्रमण करून घर बांधणाऱ्या राहुरी खुर्द येथील तिघा ग्रामपंचायत सदस्यांचे अपर जिल्हाधिकारी बी़ एच़ पालवे

By encroachment, the three gram panchayat members canceled their membership | अतिक्रमण केल्याने तिघांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द

अतिक्रमण केल्याने तिघांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द


अहमदनगर : शासकीय जागेत अतिक्रमण करून घर बांधणाऱ्या राहुरी खुर्द येथील तिघा ग्रामपंचायत सदस्यांचे अपर जिल्हाधिकारी बी़ एच़ पालवे यांनी सदस्यत्व रद्द करण्याचा शनिवारी निर्णय दिला़ याबाबत गावातील माजी सरपंच मधुकर साळवे यांनी अ‍ॅड़ शेखर दरंदले यांच्यामार्फत तक्रार दाखल केली होती़
अलका लक्ष्मण खेमनर, उमेश कोंडाजी बाचकर व अंबादास विठ्ठल साखरे असे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे़ खेमनर या राहुरी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्ऱ ४ मधून महिला राखीव प्रवर्गातून निवडून आल्या होत्या़ त्यांचे पती लक्ष्मण खेमनर यांनी शासकीय जागेत अतिक्रमण करून घर बांधले होते़ बाचकर हे वॉर्ड क्ऱ ४ मधून राखीव प्रवर्गातून निवडून आले होते़ त्यांनीही शासकीय जागेत अतिक्रमण करून घर बांधले होते़ साखरे हे वॉर्ड क्ऱ ५ मधून राखीव प्रवर्गातून निवडून आले होते़ त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठाच्या मालकीच्या मिळकतीतवर घर बांधून अतिक्रमण केले होते़ या सदस्यांविरोधात केलेली तक्रार सिद्ध झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले़ तक्रारदारांतर्फे अ‍ॅड़ शेखर दरंदले यांनी काम पाहिले़
(प्रतिनिधी)

Web Title: By encroachment, the three gram panchayat members canceled their membership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.