जिल्हा रुग्णालयाच्या जागेत अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:24 IST2021-09-23T04:24:26+5:302021-09-23T04:24:26+5:30
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाच्या मालकीच्या असलेल्या चितळे रोडवरील जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय जमिनीवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आले आहे. ...

जिल्हा रुग्णालयाच्या जागेत अतिक्रमण
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाच्या मालकीच्या असलेल्या चितळे रोडवरील जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय जमिनीवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण हटविण्यात यावे, याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी महापालिका आयुक्तांना ३१ ऑगस्ट रोजीच पत्र दिले आहे. मात्र महापालिकेने त्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली दिसून आली नाही.
चितळे रोडवरील शासकीय जमिनीवर खासगी लोकांनी पक्के बांधकामाचे अतिक्रमण केले आहे. खासगी व्यक्तीकडे चौकशी केली असता, महापालिकेनेच बांधकामाला परवानगी दिल्याचे सांगण्यात आले आहे, असे पोखरणा यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. हे बांधकाम तत्काळ जमीनदोस्त करावे, तसेच हा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात यावा, हे बांधकाम पूर्वीपासून असल्याचेही पत्रात म्हटले आहे. मात्र एक महिना झाला तरी या पत्रावर कार्यवाही केली नसल्याचे प्रत्यक्ष जागेवर दिसत आहे.