पाणी भरण्याच्या वादातून महिलेस मारहाण करणा-यास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 14:18 IST2018-09-01T14:18:01+5:302018-09-01T14:18:19+5:30
मोटार चालु करुन पाणी का भरले या कारणास्तव झालेल्या भांडणातुन महिलेस जबर जखमी करणा-या आरोपीस नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. टिकले यांनी दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

पाणी भरण्याच्या वादातून महिलेस मारहाण करणा-यास सक्तमजुरी
नेवासा : मोटार चालु करुन पाणी का भरले या कारणास्तव झालेल्या भांडणातुन महिलेस जबर जखमी करणा-या आरोपीस नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. टिकले यांनी दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली.
नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील वनिता खरात हिने शेजारी राहणा-या आरोपी रोहिदास बनकर याच्या भावाच्या सांगण्यावरून मोटार चालु करुन पाणी भरण्यास सुरवात केली असता आरोपी रोहिदास बनकर व त्याची पत्नी यांनी वनिता खरात यांना काठीने मारहाण करून जखमी केले व शिविगाळ केली. त्याबाबत वनिता खरात हिने नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्यावरुन आरोपीविरुद्ध गु .र.नं.७९ /२०१५ चा भा.द.वि.कलम ३२५ ,३२३ ,५०४ ,५०६ कलमा अन्वेय गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डि.बी.कांबळे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलेले होते.
खटल्याची सुनावणी होऊन सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. समोर आलेला पुरावा व सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी रोहिदास बनकर यास शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल एम.आर.नवले यांनी कामकाज पाहिले.