श्रीरामपूर नगरपालिकेचे कर्मचारी दंड वसूल करताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:19 IST2021-04-14T04:19:03+5:302021-04-14T04:19:03+5:30

जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार भरवण्यास बंदी घातलेली असतानाही, पालिकेने बळजबरीने गरीब शेतकऱ्याकडून करवसुली केली व नंतर हाकलून दिले. केवळ मास्क वापरत ...

Employees of Shrirampur Municipality are collecting fines | श्रीरामपूर नगरपालिकेचे कर्मचारी दंड वसूल करताहेत

श्रीरामपूर नगरपालिकेचे कर्मचारी दंड वसूल करताहेत

जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार भरवण्यास बंदी घातलेली असतानाही, पालिकेने बळजबरीने गरीब शेतकऱ्याकडून करवसुली केली व नंतर हाकलून दिले. केवळ मास्क वापरत नाही म्हणून शहरातील व्यापाऱ्यांना दंड करत असून, आरोग्याच्या सुविधा देण्यास पालिका टाळाटाळ करत आहे. कोरोना तपासणी केंद्र अजूनही सुरू झालेले नाही. लस घेण्याची सोय अजूनही शहरात उपलब्ध नाही. शहरातील वाढता कचरा, दूषित पाणी, जंतुनाशक फवारणी, स्वच्छता याकडे दुर्लक्ष करून पालिका सत्ताधाऱ्यांनी शहरातील जनतेला रोगराईच्या खाईत लोटले आहे.

श्रीरामपूर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठी असून, उपनगराध्यक्ष करण ससाणे व काँग्रेस नगरसेवकांनी वारंवार शहरात कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी केली होती. देवळाली प्रवरा, संगमनेर अशा अनेक नगरपालिकांनी शहरांत कोविड सेंटर सुरू केलेली आहेत. परंतु, श्रीरामपूर पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी केवळ याकडे दुर्लक्ष केले आहे. नगराध्यक्षा केवळ फोटो काढण्यातच मग्न असून, जनतेचे त्यांना काही देणे-घेणे नसल्याचा आरोप माजी नगरसेवक आशिष धनवटे यांनी केला आहे.

----------

जिल्हा अध्यक्षपदी अमृता खोतकर

श्रीरामपूर : हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या पुणे जिल्हा महिला आघाडीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली, त्यात पुणे जिल्हा व शहराध्यक्षपदी अमृता खोतकर तर पुणे उपाध्यक्षपदी प्रतिभा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठक होऊन त्यात पुणे महिला आघाडीच्या जिल्हा व शहराध्यक्षांची निवड करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ॲड. राजाभाऊ देशपांडे यांनी निवड जाहीर केली. यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे, शहराध्यक्ष मंगेश छतवाणी, कोपरगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, तालुकाप्रमुख शिवाजी फोफसे, राहाता तालुकाध्यक्ष जयराम क्षीरसागर, हिंदू एकता शेतकरी आघाडीचे जयराम वाकचौरे, बाळासाहेब आगळे, अविनाश कनगरे, सोमनाथ जगताप, गुरू भुसाळ उपस्थित होते.

-------------

Web Title: Employees of Shrirampur Municipality are collecting fines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.