कर्मचाऱ्यांचे पगार आॅनलाईन
By Admin | Updated: June 13, 2014 01:14 IST2014-06-13T00:44:53+5:302014-06-13T01:14:10+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार पंचायत राज सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.

कर्मचाऱ्यांचे पगार आॅनलाईन
अहमदनगर : शिक्षकांच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार पंचायत राज सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. यासाठी जिल्ह्यात प्रत्येक पंचायत समितीत पगार पत्रकांचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्राथमिक शिक्षक वगळता अन्य जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. यात त्याच्या नाव गावापासून त्याचा रहिवासाचा पत्ता, कोणत्या विभागात काम करतो याचा समावेश आहे. या माहितीमुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांची कुंडलीच तयार होणार असून त्याचा फायदा शासनाला होणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारात पारदर्शकता यावी, पगारपत्रक तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामात अचूकता आणि श्रमात बचत व्हावी, यासाठी या प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे.यासाठी गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या सभागृहात पगार पत्रक तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आॅनलाईन पध्दतीने पगार करण्यासंदर्भात राज्य सरकारने २१०२ मध्ये आदेश काढले होते. राज्यात सुरूवातीला ठाणे, पुणे, सातारा, रायगड आणि नाशिकमध्ये ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली आहे.
(प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांच्या कामात अचूकता यावी, त्यांच्या श्रमात बचत यावी, यासाठी राज्य सरकारने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे पगार आॅनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. पंचायत राज्य सेवार्थ प्रणालीच्या माध्यामातून ई वेतन देयके अदा करण्यात येणार आहे.
-अरूण कोल्हे,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी