अकरा वाळू तस्करांना जेलची हवा
By Admin | Updated: June 29, 2014 00:28 IST2014-06-28T23:44:17+5:302014-06-29T00:28:16+5:30
श्रीगोंदा : भीमा घोड नदीतील वाळू तस्करी व महसूल पथकावर केलेल्या हल्ला प्रकरणी पोलिसांनी अकरा जणांना जेलची हवा दाखविली.
अकरा वाळू तस्करांना जेलची हवा
श्रीगोंदा : भीमा घोड नदीतील वाळू तस्करी व महसूल पथकावर केलेल्या हल्ला प्रकरणी पोलिसांनी अकरा जणांना जेलची हवा दाखविली. त्यांच्याकडून सुमारे एक कोटीचे सहा जेसीबी व एक मोटारसायकल जप्त केली आहे.
अजिनाथ हनुमंत चापळकर, लिंपणगाव, आबासाहेब नाईक (भोसरी), कैलास डोमाळे (रा.वांगदरी), दिनकर नलगे, जालींधर पवार, सचिन भोईटे, सनी कांबळे, गोटु सुभाष मोरे (रा.सांगवी), बाळासाहेब इथापे (एरंडोली), सहदेव माळी (रा.कडा), महादेव शितोळे (अनगरे) यांना अटक केली. मुख्य वाळू तस्कर दत्ता भिसे पोलिसांना हुलकावणी देऊन पळून गेला. मागील आठवड्यात महसूल व पोलीस पथकानी सांगवी व वांगदरी येथे नदी पात्रात छापे टाकले होते. (तालुका प्रतिनिधी)