शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

अकरा दिवसात साईचरणी साडेसतरा कोटींचे दान; सुट्यांत तब्बल नऊ लाख भाविकांची साईदरबारी हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 15:47 IST

नाताळाच्या सुट्या, नववर्षाचे स्वागत यानिमित्त तब्बल नऊ लाखांपेक्षा अधिक भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली. या काळात भाविकांनी साईचरणी सुमारे साडे सतरा कोटींचे दान अर्पण केल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

शिर्डी : नाताळाच्या सुट्या, नववर्षाचे स्वागत यानिमित्त तब्बल नऊ लाखांपेक्षा अधिक भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली. या काळात भाविकांनी साईचरणी सुमारे साडे सतरा कोटींचे दान अर्पण केल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.२३ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीतील नाताळ सुट्या, साई दर्शनाने व साक्षीने सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी देशाच्या कानाकोप-यातील भाविकांनी शिर्डीत साईदर्शनासाठी गर्दी केली होती़. या काळात जवळपास ८ लाख २३ हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद झाली़.  दर्शन रांगेत ८ लाख ९७ हजार बुंदी प्रसाद पाकिटे वाटण्यात आली़. दर्शन न घेता मुखदर्शन व कळसाचे दर्शन घेऊन परतणारांची संख्याही अगणित आहे़. या कालावधीतील देणगीची शुक्रवारी मोजदाद करण्यात आली़. यात सुमारे १७.४२ कोटी रुपये देणगी प्राप्त झाल्याचे मुगळीकर यांनी सांगितले़. याकाळात ८ लाख २३ हजार साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये टाइम बेस (बायोमेट्रीक), जनसंपर्क कार्यालय व आॅनलाईन या सेवांचा समावेश असून आॅनलाईन व सशुल्क दर्शन/आरती पासेसव्दारे ४ कोटी ८ लाख ६९ हजार रुपये प्राप्त झाले़. प्रसादालयातही या काळात ८ लाख ११ हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा तर १ लाख ४७ हजार साईभक्तांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला़.या अकरा दिवसात संस्थान भक्तनिवासात १ लाख ७२ हजार, तर तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या मंडपात २८ हजार भाविकांची निवास व्यवस्था करण्यात आल्याचेही मुगळीकर यांनी सांगितले़.अशी आली देणगी... अकरा दिवसांच्या कालावधीत दानपेटीतून ९ कोटी ५५ लाख, देणगी काउंटरद्वारे ३ कोटी ४७ लाख, डेबिट क्रे डिट कार्डव्दारे १ कोटी ३८ लाख २७ हजार, आॅनलाईन देणगीव्दारे ७३ लाख २९ हजार, चेक व डिडीव्दारे १ कोटी ५० लाख ८६ हजार, मनी आॅर्डरव्दारे ४ लाख ६४ हजार, परदेशी चलनाव्दारे २४ लाख ३६ हजार अशी १६ कोटी ९३ लाख ३७ हजार रुपये देणगी रक्कम स्वरुपात प्राप्त झालेली आहे. याशिवाय ४२ लाख ३ हजारांचे २१३.६८० ग्रॅम सोने व ५ लाख ८० हजारांच्या १७ हजार २२३ ग्रॅम चांदीचा समावेश आहे.

टॅग्स :saibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिर