वीज चोरांवर यापुढे फौजदारी - बावनकुळे
By admin | Updated: April 27, 2017 14:57 IST
वीज चोरांविरुद्ध आता थेट पोलीस ठाण्यातच फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाºयांना दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.
वीज चोरांवर यापुढे फौजदारी - बावनकुळे
आॅनलाइन लोकमतशिर्डी (अहमदनगर), दि़ २७ - वीज वितरणातील गळती कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. वीज चोरांविरुद्ध आता थेट पोलीस ठाण्यातच फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाºयांना दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.साईदर्शनासाठी आलेल्या बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, वीज वितरणातील मोठी गळती कमी करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून विविध उपाययोजना केल्या आहेत. उपकेंद्रावरुन होणारे वीज वितरण व ग्राहकांकडून होणारा विजेचा वापर याचे आॅडिट करून वीज गळतीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. यापुढे विजेचे भारनियमन करतांना व्यावसायिक धोरण घेतले जाईल़ ज्या भागात वसुली चांगली आहे, तेथे भारनियमन असणार नाही़ तसेच वसुलीसाठी संबंधित विभागातील अधिकाºयाला जबाबदार धरण्यात येईल. वीज चोरांची नावेही यापुढे जाहीर करण्यात येतील़देशात प्रथमच ऊर्जा विभागाने सर्वोत्कृष्ट मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे. त्याद्वारे ग्राहकांना वीज बिल भरण्यापासून त्यांच्या तक्रारी व रिडींग संदर्भात सुविधा उपलब्ध होतील, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.