मुळा धरणावर वीज प्रकल्प कामास सुरूवात

By Admin | Updated: May 25, 2014 00:32 IST2014-05-24T23:58:42+5:302014-05-25T00:32:18+5:30

राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावर वीज प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे़

Electricity Project on Radha Dam | मुळा धरणावर वीज प्रकल्प कामास सुरूवात

मुळा धरणावर वीज प्रकल्प कामास सुरूवात

राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावर वीज प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे़ दुसर्‍या टप्प्यात धरणाच्या डाव्या कालव्यावर वीज प्रकल्पास सुरुवात होणार असून दररोज सर्वसाधारण ४़९० मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे़ मुळा धरणावरील डाव्या कालव्यालगत रस्ते व साफसफाईच्या कामाला सुरूवात झाली आहे़ उजव्या कालव्याखालील वीज प्रकल्पाच्या कामाला गती आल्यानंतर डाव्या कालव्याखालील कामास सुरूवात होणार आहे़ अडीच ते तीन वर्षात दोन्ही कालव्यावरील वीज निर्मितीला प्रत्यक्षात सुरुवात होईल. पुणे येथील कामगार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीला वीज निर्मिती प्रकल्प बीओटी तत्वावर देण्यात आला आहे़ कंपनीने शासनाशी ३० वर्षाचा करार केला आहे़ वीज निर्मिती प्रकल्पावर सर्वसाधारण ३५ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे़ मुळा धरणाचा उजवा व डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना वीज तयार करण्यात येणार आहे़वर्षभरातील सर्वसाधारण १७० दिवस दोन्ही कालव्यावर वीज निर्मिती होणार आहे़निर्माण झालेली वीज महावितरणला पुरविण्यात येणार आहे़नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी विजेची निर्मिती करून महावितरणला विजेचा पुरवठा केला़ नजीकच्या काळात मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून निर्माण होणारी वीज महावितरणला मिळणार आहे़ या वीज प्रकल्पातून काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे़ (तालुका प्रतिनिधी)गाजावाजा करून मुळा धरणावरून हवाई उड्डाणाची चाचणी घेण्यात आली़ सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही दोन महिने झाले तरी हवाई विमानसेवा सुरू झाली नाही़इच्छुक हवाई प्रवास करू इच्छिणार्‍यांचे लक्ष हवाई कंपनीच्या निर्णयाकडे वेधले आहे़

Web Title: Electricity Project on Radha Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.