अंगावर विजेची तार पडून शेतक-याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 17:58 IST2018-06-30T17:58:11+5:302018-06-30T17:58:21+5:30
धामोरी बुदु्रक येथे विजेची तार अंगावर पडून झालेल्या आपघातात नारायण रामभाऊ खुदळे वय-५९ यांचा मृत्यू झाला. बुधवारी (२७ जून) घडलेली घटना काल लक्षात आली.

अंगावर विजेची तार पडून शेतक-याचा मृत्यू
वांबोरी : धामोरी बुदु्रक येथे विजेची तार अंगावर पडून झालेल्या आपघातात नारायण रामभाऊ खुदळे वय-५९ यांचा मृत्यू झाला. बुधवारी (२७ जून) घडलेली घटना काल लक्षात आली.
नारायण कुदळे हे शेतीच्या कामानिमित्त धामोरी येथे राहत होते. ऊसाच्या शेतात असलेल्या पाऊल वाटेने जात असल्याने कुदळे यांच्या अंगावर अचानक विजेची तार पडल्याने त्यांचे जागीच निधन झाले. ठिकाण एकांत असल्याने घटना लवकर कुणाच्याही लक्षात आली नाही. परीगाबाई दुधाट यांच्या शेतातून वास आल्यानंतर घटना लक्षात आली. पोलिस पाटील खंडू जाधव यांनी वांबोरी पोलिसांना यासंदर्भात माहीती दिली. पुढील तपास किरण बनसोडे करीत आहेत.