विजेचा शॉक बसून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 15:53 IST2018-10-19T15:53:44+5:302018-10-19T15:53:49+5:30
नळाला लावलेल्या विद्युत मोटारीच्या वायरमध्ये पाय अडकल्याने विजेचा शॉक बसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला

विजेचा शॉक बसून तरुणाचा मृत्यू
शेवगाव : नळाला लावलेल्या विद्युत मोटारीच्या वायरमध्ये पाय अडकल्याने विजेचा शॉक बसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विजय चंद्रकांत काशीद असे मृत तरुणाचे नाव आहे. घटना शहरातील इंदिरानगर परिसरात घडली.
इंदिरानगर परीसरातील हा तरुण बांधकाम मजूर म्हणून कार्यरत होता. दस-याच्या आदल्या दिवशी पाणी भरण्यासाठी तो घरी थांबला होता. पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने त्याने नळाला विद्युत मोटार लावली. अचानक वायरमध्ये पाय गुंतल्याने काशीद यास विजेचा शॉक बसून विद्युत मोटारीसह हौदात पडला. त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला.